आपल्या क्षेत्राचा भू नकाशा ऑनलाइन पहा.

Bhunakasha

भू नकाशा पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुढील वेबसाईटवर जावे.     https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html

  1. सर्वप्रथम आपले राज्य महाराष्ट्र निवडावे
  2. त्यानंतर कॅटेगिरी मधून ग्रामीण साठी Rural व शहरीसाठी Urban निवडावी.
  3. आपला जिल्हा व तालुका निवडावा. त्यानंतर आपल्या गावाचे नाव निवडावे.
  4. Search Plot No मध्ये आपला प्लॉट नंबर टाकून सर्च करावे. त्यानंतर आपल्याला आपला प्लॉट नंबर दिसेल.

वरील सर्व नकाशे नागरिकांना माहितीस्तव उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.सदरील नकाशाचा कोणत्याही व्यावसायिक अथवा कायदेशीर कामासाठी वापर करता येणार नाही.संबंधित नकाशाची प्रमाणित प्रत आपल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे

जमीन मोजणी क प्रत ऑनलाईन पहा.(भूमि अभिलेख विभागाची)

क प्रत

जमीन मोजणीची क प्रत पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे.   https:/bhulekh.mahabhumi.gov.in

  1. आपला जिल्हा तालुका व गावाचे नाव निवडावे
  2. यानंतर कॅटेगिरी मधून भूमापन व नागरी भूमापन यामधून योग्य तो पर्याय निवडावा
  3. योग्य तो जमिनीचा मोजणी प्रकार उद्देश निवडावा. उदाहरणार्थ – बिगर शेती, पोटहिस्सा ,हद्द कायम, गुंठेवारी  किंवा कोर्ट कमिशन
  4. मोजणी प्रकाराचा कालावधी निवडावा जसे की नियमित, तातडी, अति तातडी किंवा अति अति तातडी
  5.  आपल्याला मिळालेला मोजणी रजिस्टर नंबर मो.र. नंबर टाकावा
  6. मोजणीची क प्रत पाहण्यासाठी मोबाईल नंबर व भाषा निवडावी
  7.  सांकेतिक क्रमांक (Captcha) लिहून त्यासमोरील सर्च बटनावर क्लिक करावे
  8. त्यानंतर आपल्याला आपली क प्रत दिसेल

डिजिटल सातबारा (Digital Signed Satbara) डाऊनलोड करणे.

 डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे.     https://www.digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr

  1. सर्वप्रथम सातबारा डाऊनलोड करण्यासाठी वरील वेबसाईटवर आपल्याला Account Create (अकाउंट क्रिएट) करावे लागेल.
  2. त्यानंतर Captcha  कॅपचा टाकून लॉगिन करावे. जिल्हा,तालुका व गावाचे नाव निवडावे. सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा.
  3. त्यानंतर Download (डाउनलोड या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा सातबारा तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल.

जमिनीचे मालमत्ता पत्रक (Property Card)ऑनलाईन पहा

 जमिनीचे मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे.  https://bhulekh.mahabhumi.gov.in/

  1.  वरील वेबसाईटवर जाऊन प्रथम विभाग निवडावा. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नाव निवडावे
  2. आपल्या तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयाचे नाव निवडावे आपल्या गावाचे नाव निवडावे त्यानंतर C.T.S. No.(सिटी सर्वे नंबर) अथवा नगर भूमापन क्रमांक निवडावा.
  3. त्यानंतर न.भू.क्र.शोधा यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपले मालमत्ता पत्रक (Property Card)  दिसेल.
  4. जमिनीचे Property Card (मालमत्ता पत्रक) पाहण्यासाठी पुढील   वेबसाईटवर क्लिक करावे.  https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  5. जमिनीचे Property Card (मालमत्ता पत्रक) डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबसाईटवर क्लिक करावे. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr

ऑनलाईन जमीनीचा सातबारा उतारा ,आठ अ व मालमत्ता पत्रक (Property Card) Online पहा.

 ऑनलाइन जमिनीचा सातबारा पाहण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे.   https://bhulekh.mahabhumi.gov.in/

  1. आपला जिल्हा,तालुका व गावाचे नाव निवडावे
  2. आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा
  3. आपला मोबाईल नंबर टाकून भाषा निवडावी
  4. नंतर सांकेतिक क्रमांक ( Captcha) टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे
  5. त्यानंतर आपल्याला आपल्या गटाचा किंवा सर्वे नंबर चा सातबारा दिसेल