डिजिटल सातबारा (Digital Signed Satbara) डाऊनलोड करणे. डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबसाईटवर जावे. https://www.digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr सर्वप्रथम सातबारा डाऊनलोड करण्यासाठी वरील वेबसाईटवर आपल्याला Account Create (अकाउंट क्रिएट) करावे लागेल.त्यानंतर Captcha कॅपचा टाकून लॉगिन करावे. जिल्हा,तालुका व गावाचे नाव निवडावे. सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा.त्यानंतर Download (डाउनलोड या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुमचा सातबारा तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल.